तंव अंतरिक्ष गगनी ! अवचित झाली आश्रिणी!
भक्त करतील मेदिनी! ज्ञानदेवे दरूशने !!1!!
धन्य धन्य वृक्ष अजान ! धन्य सिध्देश्वर स्थान!
ज्ञानदेव समाधान ! धन्य अलंकापुरी!!2!!
आळंदी मध्ये अजानवृक्ष नावाचे प्राचीन दुर्मिळ असा एक पवित्र वृक्ष आहे.
प्राचीन अजानवृक्ष हया झाडाखाली भाविक ज्ञानेश्वरीचे पारायण करतात. ज्ञानेश्वर माउलींनी या पवित्र झाडाखाली संजीवन समाधी घेतली होती.
श्रीज्ञानेश्वर माऊलीच्या हातातील काठी याच वृक्षाची असून समाधीच्या वेळी त्यांनी बाजूला ठेवली व त्यापासून अजान वृक्ष नावाचे पवित्र झाड तयार झाले अशी आख्यायिका आहे.
माऊली मुळे पवित्र झालेल्या अजान वृक्षाची पाने व फळे मृत्युला जिंकण्याचे सामर्थ ठेवतात,असे श्रीएकनाथं महाराजांनी वर्णन केले आहे. या पवित्र वृक्षाखाली बसून पारायन किंवा वाचन केल्यास दिव्य ज्ञानाचा लाभ होतो असे समजतात.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात अजान वृक्षाचा उल्लेखही सापडतो.
अजान वृक्ष या पवित्र वृक्षाचे मुळ हे ज्ञानेश्वर माऊलींच्या गळया भोवती आले होते त्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराजांनी संत एकनाथ महाराजांना स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत दिला व गळया भोवती आलेले अजान वृक्ष या पवित्र वृक्षाचे मुळ काढण्यास विनंती केली होती.
त्यावेळेस संत एकनाथ महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी शोधून काढली व तेथे जाऊन ती गळया भोवतालची मुळे काढली.
श्रीक्षेत्र पंढरपुरला आषाढी वारी मध्ये स्वेच्छेने
वैकुंठगमण करणारे आधुनिक काळातील भिष्माचार्य
श्री संत वासुदेवजी महाराज
हा एकमेव असा प्रसंग आहे ज्यात महाराज झोपून (प्रकृती गंभीर असल्याने) बोलत आहेत. अंतिम वेळेत आत्मज्ञान सांगणारे अत्यंते व्यक्तीत्व.
यात सांगणारे आणि ऐकणारे दोघेही अधिकारी महात्मा पुरूष आहेत (गुरूवर्य वासूदेवजी महाराज आणि गुरूवर्य शांतीब्रम्ह मारोतीबाबा कुऱ्हेकर)
संपूर्ण प्रसंग असा घडला
आषाढ शुध्द चतुर्थी, शुक्रवार दिनांक 26/06/2009 ला नेहमीप्रमाणे शेगावातून गाडी महाराजांना पंढरपूरला घेऊन जायला आली. त्याप्रमाणे महाराज निघाले निरोप दयायला बाहेरगावची व स्थानिक अशी बरीच मंडळी होती. परंतु मोहोकार कुटुंबीय व निकटची भक्तमंडळी साशंक होते. कारण गेले पंधरा दिवस महाराजांची प्रकृती बरी नव्हती. सर्वांनी अत्यंत भक्तीने महाराजांना निरोप दिला. पुढे काय होईल याची कुणी कल्पनाही करू शकत नव्हते. महाराजांनी सौ गीताआक्का व श्री माधवराव काका यांना सागितले की माझे रस्त्यातच जर काही बरे वाईट झाले तर मला परत आणू नका. मला पुढे पंढरपूरलाच घेऊन जावे.
सायंकाळी शेगावला पोहोचले व तिथे सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. शनिवारी सकाळी दिनांक 27/06/2009 ला पंढरपूरला पोहचले. संस्थांनाच्याच भक्तनिवासात महाराजांचा मुक्काम असे, याहीवेळी तेथेच मुक्कामास थांबले. सर्वजण शुचिर्भूत होऊन विट्ठलाच्या दर्शनाला गेले. तिथे विट्ठलाला नमस्कार करून अत्यंत सद्गदित स्वरात एकच मागणे महाराजांनी मागितले.
हीच व्हावी माझी आस जन्मोजन्म तुझा दास
सोमवारी सकाळी मारूतीबुवा कुऱ्हेकर वासुदेव महाराजांना भेटायला आले मारूतीबुवा सोबत अध्यात्मावर चर्चा झाली. महाराज मारूतीबुवांना म्हणाले आता मला सुखाने जावे वाटते मारूतीबुवा त्यांना म्हणाले महाराज तुमचा आम्हाला आधार हवा आहे. महाराज त्यांना म्हणाले , मला माऊली कृपेने अजूनही आत्माज्ञान आहे असे म्हणून त्यांना परमोच्च ज्ञानाच्या दोन चार ओव्या सांगितल्या
‘‘ तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ सिध्द वस्तूची आहो का जे दोरी सर्पत्व वावो दोराचिकडूनी’’
‘‘मज तरंगपण असे कि नसे हे उदकांसि कही प्रतिभासे ते भलतेव्हा जैसजैसे उदकची की
‘‘तरंगाकारे न जन्मेची ना तरंगलोपे न निमेची तेवी देही जे देहेची वस्तू झोले ‘‘ मग भलतेथ देहबंधू असो अथवा जावा परी अबंधा नित्य ब्रहमभावा बिघाड नाही’’
असे दिव्य आत्मज्ञान ऐकून मारूतीबुवा उपस्थितांना म्हणाले,‘‘ ते ऋणवैपण देखोनी आंगी आपुलियाची उत्तीर्णत्वानागी भक्ताचिया तनुत्यागी परीचर्या करी देह वैकल्याचा वारा झणे लागेला या सुकुमारा म्हणौनी आत्मबोधाचा पांजिरा सुये तयाते’’
अशा ओव्या त्यांनी म्हटल्या. त्यांनी सांगितले की वासुदेव महाराजांचा सांभाळ प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलीच करीत आहेत. अशा परमज्ञानी साक्षात ईश्वरच असलेल्या महाराजांची सेवा करणारे सर्व भक्त मंडळीत धन्य धन्य आहेत. मंगळवार दि. 30/06/2009. ला संस्थांच्या परिसरात महाराजाचे दुपारी चार वाजता प्रवचन झाले. प्रवचनाची ओवी होती. ‘‘ विपाये जरी आठविले चित्ता तरी दे आपली योग्यता हे असो तयाते प्रशंसिता लाभु आथी ‘‘ प्रवचनामध्ये श्री गजानन महाराज व भास्कर महाराज यांचे चरित्र सांगितले. ‘‘ भास्कर महाराज जशी गुरूसेवा केली तशी सेवा श्रोत्यांकडून घडत राहो ‘‘ असा आशीर्वाद दिला. गजानन महाराज साक्षात परमेश्वर आहेत हे सांगितले त्यांच रात्री तिथेच महाराजांचे हरिकीर्तन झाले किर्तनाला अभंग घेतला.
‘‘हीच व्हावी माझी आस जन्माजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुको न हरी’’
त्यामधे पंढरपूरचा महिमा वर्णन केला. सर्वांना पंढरीची वारी करायला सांगितले आणि आळंदी. माऊली, अजानवृक्ष आदिंचेही भरपूर महात्म्य वर्णन केले.
गुरूवार दि. 02/07/2009 आषाढ शुध्द दशमीला सकाळी वडील ‘पुंडलिक महाराज जायले’ यांची पुण्यतिथी वारकऱ्यांना अन्नदान करून साजरी केली. महाराजांचे ज्ञानेश्वर माऊलींचे स्मरण व चिंतन सतत सुरू होते. रात्री 9:00 वाजता जमलेल्या भक्त मंडळीना ते विचारीत माऊली आली का? विट्ठलबुवा इंगळेंनी सांगितले की, माऊलींची पालखी आलेली आहे. मग एका भक्ताला अजानवृक्षाचे पान मागितले. त्या पानाचे सौ. गीताआक्कांनी चुर्ण केले. महाराजांनी त्याचे सेवन केले.
रात्री 9:45 वा. श्री गजानन महाराज संस्थांनमध्ये नित्यनेमाच्या कीर्तनात गजर झाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम गजर एकताच माऊली माऊली म्हणून डोळे कायमचे मिटले एक तेजस्वी, भक्तीचा, ज्ञानाचा दीप विझला. चालता बोलता पंढरपूरच्या वाळवंटात हरवला. उपस्थित भक्तमंडळी सैरभैर झाली. एकच आक्रोश सुरू झाला
आपले महारज गेले हे समजल्याबरोबर भक्तमंडळीमध्ये खळबळ झाली. जो तो संस्थांकडे धावत सुटला. दीनजनांचा आधार हरपला लाखो भक्त पोरके झाले. महाराजांनी सहज डोळे मिटले जणूकाही काळाला मारलेली ती प्रेमाची मिठीच होती. निसर्ग नियमाला अनुसरून मृत्यू प्रेमाने जवळ बोलावले. झाकलिया या घटीचा दिवा नेणिजे काय झाला केधवा यापरी जो पांडवा देह ठेवी अशा रितीने जो देह ठेवील तो साक्षात देवच होतो. महाराजांनी सतत नामचिंतन केले. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले आहे. ऐसे जे नित्ययुक्त तयासी मी सुलभ सतत ते देहांती निश्चित मीची होती भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये संागीतले आहे. अंतकालेच मामेव स्मरन्मुकक्ता कलेवरम् य प्रयाति स मध्दावं याती नास्त्यत्र संशयः जो आयुष्यभर क्षणमात्र न विसरता ईश्वरचिंतन करेल तो शेवटी ईश्वराला येऊन मिळतो. ती वेळ 9:45 ची होती. गावोगावी भक्त मंडळींना दूरध्वनी केले. सर्व भक्त मंडळी ताबडतोब पंढरपूरकडे निघाली. जे पंढरपुरात होते ते सर्व अंतिम दर्शनासाठी सस्थंाकडे गोळा झाले. सर्वजण आक्रंदून रडायला लागलेे . अत्यसंस्कर 03/07/2009 ला( आषढी एकादशीला ) करायचे ठरले.
जय जय राम कृष्ण हरि
Reference :-
https://www.facebook.com/groups/150222028895840/permalink/440280346556672